Thur, June 1, 2023

कूर-पिंपळगाव रस्त्यासाठी ४० कोटींचा निधी : आमदार आबिटकर
कूर-पिंपळगाव रस्त्यासाठी ४० कोटींचा निधी : आमदार आबिटकर
Published on : 18 March 2023, 5:43 am
कूर-पिंपळगाव रस्त्यासाठी ४० कोटी
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील कूर ते पिंपळगाव २२ किलोमीटर रस्त्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. सर्वाधिक वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या कूर ते पिंपळगाव रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याचा वाहनधारक, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून रस्ता दुरुस्तीची मागणी होत होती. यंदाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार २२ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ४० कोटींचा निधी मंजूर केला. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले.