गारगोटी : आवश्यक आदमापूर जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : आवश्यक आदमापूर जागर
गारगोटी : आवश्यक आदमापूर जागर

गारगोटी : आवश्यक आदमापूर जागर

sakal_logo
By

02865
संत बाळूमामांचा आज जागर
भंडारा यात्रा; निढोरी-आदमापूर मार्गावर रथाची मिरवणूक

गारगोटी, ता. १७ : आदमापूर येथील संत बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेनिमित्त उद्या (शनिवारी) जागर होत आहे. मुख्य दिवसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होतील. निढोरी ते आदमापूर मार्गावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामांच्या रथाची मिरवणूक निघेल, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी दिली.
सकाळी ११ वाजता निढोरीतून रथ मिरवणुकीस प्रारंभ होईल. यावर्षी ‘श्रीं’चा रथ ओढण्याचा मान नंदकुमार शिवळे (वाल्हेकरवाडी, पुणे) व दत्तात्रय भोंडवे (रावेत, पुणे) यांच्या बैलजोडीस मिळेल. ढोल-कैताळाच्या आवाजात धनगरी बांधव, हलगी-घुमक्याच्या ठेक्यावर डोलणाऱ्या भक्तांसह डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई तल्लीन होईल. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत श्रींच्या रथाचे उत्साही वातावरणात आदमापुरात आगमन होईल. मिरवणुकीत भक्तीचा जागर अनुभवायला मिळेल. जागरादिवशी राजस्थान व मध्यप्रदेशमधील धनगर बांधवांनी ५० लाख रुपये खर्चून दिलेल्या रथामध्ये बाळूमामांची १३८ किलो वजनाची चांदीची मूर्ती बसविली आहे. फुलांनी रथ सजाविला आहे. संत बाळूमामांच्या अठरा बकऱ्यांच्या कळपातून आलेल्या दुधाचे कलश घेऊन आदमापुरातील सुहासिनी श्रींच्या रथाचे औक्षण करतील. जागरादिवशी पहाटे बाबूराव डोणे यांची भाकणूक होईल. रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.