आदमापुरात संत बाळूमामांचा रथोत्सव उत्साहात

आदमापुरात संत बाळूमामांचा रथोत्सव उत्साहात

02867
आदमापूर : हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघालेला संत बाळूमामांचा रथोत्सव सोहळा.
....................

आदमापुरात संत बाळूमामांचा रथोत्सव उत्साहात

दूध कलश पूजन : ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’चा जयघोष

गारगोटी, ता. १८ : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामांच्या भंडारा यात्रेनिमित्त रथोत्सव सोहळा उत्साहात झाला. निढोरी ते आदमापूरपर्यंत निघालेल्या या सोहळ्यात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ''बाळूमामांच्या नावानं चांगभलं''चा जयघोष करीत त्यांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली.
राज्याच्या अनेक भागांतील दिंड्यांतून आलेले भाविक रथोत्सवात सहभागी झाले होते. उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. मिरवणुकीत कीर्तन-प्रवचनाबरोबर टाळ-मृदंगांचा गजर, ढोल-ताशांचा दणदणाट, भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत भाविकांनी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष केला. रथामध्ये संत बाळूमामांची चांदीची मूर्ती बसविली होती. रथाला फुलांची आकर्षक सजावट केली होती. देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते रथपूजन झाले. यावेळी संत बाळूमामांच्या अठरा बकऱ्यांच्या बग्ग्यांमधून आणलेले दूध कलश पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने आणले. यावर्षी रथ ओढण्याचा मान नंदकुमार शिवळे (वाल्हेकरवाडी, जि. पुणे) व दत्तात्रय भोंडवे (रावेत, जि. पुणे) यांच्या बैलजोड्यांना मिळाला. दरम्यान, मिरवणूक मार्गावर भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक व सरबत वाटप झाले.
दरम्यान, संत बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादाकरिता १८ बग्ग्यांतील मेंढ्यांच्या दुधाचे कलश निढोरी येथे एकत्र करून रथातून आदमापुरात आणले. यातील दुधाचा बाळूमामांना अभिषेक घातला जातो. तसेच भंडारा यात्रेत खिरीच्या महाप्रसादाला महत्त्व आहे. संत बाळूमामांनी जेव्हापासून भंडारा उत्सव सुरू केला, तेव्हापासून ते स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांचे घागरभर दूध महाप्रसादात वापरत असत, तेंव्हापासून सुरू असलेली ही प्रथा आजही कायम आहे.
...

भाविकांनी परिसर गजबजला

भंडारा यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह व अन्य राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. देवस्थान समितीने संत बाळूमामा समाधीस्थळाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शन रांगांची सोय केली आहे. तसेच परिसरात जागोजागी वाहनतळाची व्यवस्था केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com