Sun, May 28, 2023

गारगोटी : तिघांवर कारवाई
गारगोटी : तिघांवर कारवाई
Published on : 18 March 2023, 6:53 am
शिकारीच्या उद्देशाने
फिरणाऱ्या तिघांवर कारवाई
गारगोटी ः भुदरगड तालुक्यातील नवले जंगलात शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघा संशयितांना कडगाव वनविभागाने अटक केली होती. आज त्यांची जामिनावर मुक्तता झाली. ७ मार्चला धुलिवंदनादिवशी शिकारीच्या उद्देशाने नवले येथील जंगलात तिघेण आढळून आले होते. बाजीराव शामराव पालकर (वय ३९, रा. वेसर्डे), अरविंद मारुती पाटील (३९) यांना १६ मार्चला वन विभागाने अटक केली होती. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. तपासात आणखी एक नाव निष्पन्न झाले. याप्रकरणी मारुती काशीनाथ पाटील (वय ४३, रा. कोरिवडे, ता. आजरा) यालाही अटक झाली होती. न्यायालयाने आज त्याची जामिनावर सुटका केली.