गारगोटी : केपीं बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : केपीं बैठक
गारगोटी : केपीं बैठक

गारगोटी : केपीं बैठक

sakal_logo
By

02876
सर्वांना सोबत घेऊनच
‘बिद्री’ निवडणूक लढविणार

के. पी. पाटील; मुदाळला कार्यकर्त्यांची बैठक

गारगोटी, ता. १९ : बिद्री साखर कारखान्याची निवडणूक कार्यक्षेत्रातील सभासदांना विश्वासात व सोबत घेऊन लढविणार आहे. यामुळे ‘बिद्री’ची सत्ता व नावलौकिक अबाधित ठेवण्यासाठी मला पुन्हा साथ द्या, असे आवाहन अध्यक्ष व माजी आमदार के. पी पाटील यांनी केले.
मुदाळ (ता. भुदरगड) येथे बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे अध्यक्षस्थानी होते. श्री. पाटील म्हणाले, ‘बिद्री कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्याने यावर्षी उच्चांकी ऊस गाळप झाले. उच्चांकी दर दिला आहे. यामुळे व्यवस्थापन मंडळावर सभासदांचा प्रचंड विश्वास असून निवडणुकीत सभासद मताच्या रुपात आशीर्वाद देतील.
पंडितराव केणे म्हणाले, ‘बिद्री’ अध्यक्षपदाची के. पी. पाटील यांनी अनेक वर्षे धुरा सांभाळून शेतकऱ्यांचे हित जोपासले. त्यांच्याच नेतृत्वाखाली बिद्री साखर कारखाना यापुढे प्रचंड प्रगती करेल.’
यावेळी उपाध्यक्ष धोंडीराम वारके, संचालक मधुकर देसाई, धनाजी देसाई, के. ना. पाटील, बापूसो आरडे, सर्जेराव देसाई, शेखर देसाई, अशोक साळोखे, प्रकाश पाटील, अमित देसाई, शरद मोरे, जगदीश पाटील, विलास झोरे, एन. डी. कुंभार, काशिनाथ देसाई, दत्तात्रय मोरबाळे, संग्राम देसाई, टी. एल. पाटील, पांडुरंग सोरटे, बाळ जाधव उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.