गारगोटी : बाळूमामा देवस्थान सभा

गारगोटी : बाळूमामा देवस्थान सभा

02906
आदमापूर : संत बाळूमामादेवस्थानचे कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपस्थित विश्वस्त.
...

सर्वांना विश्वासात घेऊनच कामकाज

कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले : बाळूमामा देवस्थानची सभा खेळीमेळीत


गारगोटी, ता. ७ : ‘आदमापूर ग्रामस्थ व भक्तांसह सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज केले जाईल. आजपर्यंत जसे सहकार्य केले आहे तसेच मला यापुढेही सहकार्य करावे. बाळूमामांच्या भक्तांना सर्व सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अविरत कष्ट करून बाळूमामांच्या विश्वासास पात्र राहूया. याकामी सर्वांनी शांततेचे सहकार्य करावे’, असे आवाहन नूतन कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी केले.
आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवालय समितीची मासिक सभा खेळीमेळीत झाली. शुक्रवारी मुख्य कार्यालयाच्या सभागृहात ही सभा बोलावली होती. सकाळी अकरा वाजता सभेचा कोरम पूर्ण न झाल्याने त्यानंतर एक तासाने सभा झाली. या सभेस आठ विश्वस्त उपस्थित होते. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नूतन कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले होते.
व्यवस्थापक मारुती कदम यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. विषय पत्रिकेवरील मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम केले. आर्थिक व्यवहारासंदर्भातील सह्यांचे अधिकार कार्याध्यक्ष, सचिव व खजिनदार या तिघांना देण्यात आले. संभाजी पाटील यांनी सूचना मांडली त्यास यशवंतराव पाटील यांनी अनुमोदन दिले. खजिनदारपदासाठी दत्तात्रय पाटील यांचे नाव दिनकरराव कांबळे यांनी सुचविले. त्यास दिलीप पाटील यांनी अनुमोदन दिले. माहे फेब्रुवारी २०२३ च्या जमाखर्चास व अंदाजपत्रकास मंजुरी देणे यावर चर्चा झाली. त्याला विश्वस्त इंद्रजित खर्डेकर, संदीप मगदूम यांनी मंजुरी द्यावी असा ठराव मांडला. त्यास सभागृहाने मंजुरी दिली. सभेस विश्वस्त दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, संदीप मगदूम, इंद्रजीत खर्डेकर, संभाजी पाटील, दिलीप पाटील उपस्थित होते.
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com