गारगोटी : ११ कोटी १९ लाखांचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : ११ कोटी १९ लाखांचा निधी
गारगोटी : ११ कोटी १९ लाखांचा निधी

गारगोटी : ११ कोटी १९ लाखांचा निधी

sakal_logo
By

मागासवर्गीयांच्या विकासासाठी
११ कोटी १९ लाखांचा निधी
आमदार आबिटकर ; वाघापुरात आज समाजमंदिर लोकार्पण

गारगोटी, ता. १३ : राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यांतील मागासवर्गीय समाजाकरिता समाजमंदिर, अंतर्गत रस्ते, गटर्स, सुशोभीकरणासह विविध विकासकामांकरिता ११ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून उद्या (शुक्रवारी) वाघापूरला ४० लाख खर्चून उभारलेल्या समाजमंदिराचे लोकार्पण समाजबांधवांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राज्य शासनाच्या विविध योजनांतून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यांतील मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी ११ कोटी १९ लाख रुपये मंजूर केले. तीन तालुक्यांच्या ठिकाणी बौध्दविहारासाठी ५ कोटीप्रमाणे १५ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. यासह भुदरगड तालुक्यातील फणसवाडीत मागासवर्गीय मुले व मुलींकरिता वसतिगृह बांधण्यासाठी प्रत्येक २३ कोटी ५० लाख याप्रमाणे ४७ कोटींचा निधी प्रस्तावित केला असल्याचे सांगितले. दरम्यान, वाघापूर येथील समारंभास सरपंच बापूसो आरडेंसह ग्रामपंचायत सदस्य व समाजबांधव उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.

फोटो : got132.jpg
आमदार प्रकाश आबिटकर