गारगोटी : प्राथमिक शिक्षक अधिवेशन

गारगोटी : प्राथमिक शिक्षक अधिवेशन

02952
प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवू
आमदार प्रकाश आबिटकर; शिक्षक संघटनेचे तालुकास्तरीय अधिवेशन

गारगोटी, ता. २५ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना बलशाली संघटना आहे. स्व. शिवाजीराव पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. भविष्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना शाखा भुदरगडच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई प्रमुख पाहुणे होते. अधिवेशनात तालुकास्तरीय पुरुष व महिला नूतन कार्यकारिणी निवड झाली. या नूतन व माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. यावेळी मधुकर देसाई, राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, राहुल देसाई, सत्यजित जाधव, नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष बी. एस. पाटील, निवृत्ती भाटले यांनी मनोगत व्यक्त केले. मावळते अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जीवन पाटील, गटनेते रवींद्र नागटीळे, सुनील देसाई, बाळकृष्ण तवटे, रणजित जावडेकर, संजय शिंदे, पी. डी. कांबळे, सचिन भोसले, श्रीकांत माणगावकर, राजू घोटणे, बी. ए. पाटील, छाया देसाई, प्रभावती कडव, रूपाली चौगले आदी शिक्षक उपस्थित होते. एकनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन, नवनीत नाईक यांनी आभार मानले.
नूतन कार्यकारिणी अशी :
पुरुष : तानाजी धारपवार (अध्यक्ष), राजेंद्र कडव (सरचिटणीस), मारुती गोडसे (कार्याध्यक्ष), सागर मोरे (कोषाध्यक्ष). महिला : पल्लवी मगदूम (अध्यक्ष), सीमा देसाई (सरचिटणीस), सुजाता राणे (कार्याध्यक्षा), रंजना भाईंगडे (कोषाध्यक्षा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com