गारगोटी : तालुका संघ निवडणूक

गारगोटी : तालुका संघ निवडणूक

भुदरगड तालुका संघासाठी दुरंगी लढत

गारगोटी, ता. २ : येथील भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीतील २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी २६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीदिवशी तब्बल २२२ जणांनी माघार घेतली. यानंतर ४५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. परंतु जागा वाटपाच्या मुद्द्यावरून अखेर निवडणूक लागली. माघारीनंतर दोन्ही आघाड्यांनी उमेदवार जाहीर केले.
व्यक्ती सभासद गटातून १८, विकास सेवा संस्था गटातून १६, अनुसूचित जाती- जमाती गटातून २, भटक्या जाती-जमाती गटातून २, इतर मागास प्रवर्गातून ३, महिला गटातून ४ अर्ज शिल्लक राहिले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी युसुफ शेख यांनी दिली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते एकवटले होते. जागा वाटपाबाबत चार दिवस बैठका सुरू होत्या. मात्र जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने अखेर निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आजी-माजी आमदार यांनी सहकारमहर्षी बी. जी. देसाई शेतकरी विकास आघाडी केली आहे. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, राहुल देसाई, कॉंग्रेसचे सत्यजीत जाधव, सचिन घोरपडे व मित्रपक्षांनी एकत्र येत ही सत्ताधारी गटाची आघाडी केली आहे. तर भाजप नेते नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, देवराज बारदेसकर, विलास बेलेकर यांनी विरोधी आघाडी केली आहे. यामुळे बिनविरोध निवडीचे प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान, दुपारी अर्ज माघारीच्या वेळेनंतर अर्ज माघार घेण्याच्या कारणावरून विरोधी आघाडीच्या नेत्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या वेळी कार्यकर्त्यांत किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com