गारगोटी : होम मिनिस्टर स्पर्धा

गारगोटी : होम मिनिस्टर स्पर्धा

पूनम डवरी ‘होम मिनिस्टर’
गारगोटी : गंगापूर (ता. भुदरगड) येथील श्री हनुमान आखाडाच्या वर्धापनदिनानिमित्त होम मिनिस्टर स्पर्धा झाली. यात निढोरीच्या पूनम गणेश डवरी प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. तर सुप्रिया संदीप माने, काजल गुरुदास डवरी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच मारुती उर्फ बट्टू जाधव यांच्या हस्ते उद्धघाटन झाले. युवतींसाठीच्या फनी गेम्स स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी दीक्षा राजेंद्र केंगार ठरली. तर द्वितीय क्रमांक ऋतुजा धनाजी भोसले व तृतीय क्रमांक प्रतीक्षा विलास तोरस्कर यांनी पटकाविला. हुतात्मा स्पनिंग मिलचे अध्यक्ष पंडितराव केणे, प्रकाश कुलकर्णी, बिद्रीचे कामगार प्रतिनिधी भीमराव किल्लेदार, प्रा. डी. डी. पाटील, सूरजसिंह केणे, बाबूराव केणे, दिगंबर ननवरे, हनुमान आखाड्याचे अध्यक्ष व सदस्यप्रमुख उपस्थित होते. विशाल बेलवळेकर पाटील निवेदक होते. अजित तोरस्कर यांनी सूत्रसंचालन, संग्रामसिंह केणे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com