
गारगोटी : आमदार आबिटकर कार्यक्रम
02974
नालंदा बुद्धविहारसाठी
५ कोटी ः प्रकाश आबिटकर
गारगोटी, ता. ९ : येथील बुद्धविहार आकर्षक आणि सर्वसोयींनीयुक्त करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. नालंदा बुद्धविहारमध्ये भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीवेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एस. के. कांबळे होते. यावेळी नालंदा बुध्दविहारसाठी ५ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार केला.
आमदार आबिटकर म्हणाले, ‘बुद्धविहाराची इमारत नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्या.’ राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान''वर व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘संविधान बदलण्याचा डाव असल्याने संविधानाचे संरक्षण करण्याची गरज आहे.’ प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी प्रास्ताविक केले. सरपंच संदेश भोपळे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण झाले. अमरसिंह संघर्षी प्रस्तुत ‘शेर भीमाचा’ कार्यक्रम झाला. दलितमित्र पी. एस. कांबळे, माजी सभापती गोपाळ कांबळे, व्ही. जे. कदम, के. टी. कांबळे, नामदेवराव कांबळे, जी. सी. कांबळे, आर. एस. कांबळे, श्रीकांत कांबळे, भिकाजी कांबळे, साताप्पा कांबळे, बबन कांबळे, प्रा. दयानंद माने, शांताराम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पी. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन, के. टी. कांबळे यांनी आभार मानले.