
गारगोटी : भुदरगड संघ मतदान
भुदरगड संघासाठी ४३.५२ टक्के मतदान
दुरंगी लढत : तालुक्यातील ५५ केंद्रांवर शांततेत मतदान
गारगोटी, ता. १३ : भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज व्यक्ती सभासद गटातून सरासरी ४३.५२ टक्के इतके मतदान झाले. तर संस्था सभासद गटातून ९८.१७ टक्के इतके मतदान नोंद झाले. २२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी विरूद्ध परिवर्तन आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. शनिवारी तालुक्यातील ५५ मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीसाठी २९,९१५ व्यक्ती सभासद व ५४७ संस्था सभासद मतदानास पात्र आहेत. त्यांच्यासाठी ५३ व्यक्ती सभासद केंद्र व २ संस्था सभासद केंद्र अशा एकूण ५५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. दिवसभरात १३ हजार २० व्यक्ती सभासद व ५३७ संस्था सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मुदाळ येथील केंद्रावर ७९.७७ व मडिलगे खुर्द केंद्रावर ७१.३८ इतके सर्वाधिक मतदान नोंद झाले.
सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार के. पी. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार बजरंग देसाई, दिनकरराव जाधव यांच्यासह कॉंग्रेस व इतर गटांनी एकत्र येत सहकारमहर्षी बी. जी. देसाई शेतकरी विकास आघाडी केली आहे. तर त्यांच्याविरुद्ध भाजप नेते नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, देवराज बारदेसकर, विनायक परूळेकर यांनी सद्गुरु मुळे महाराज परिवर्तन आघाडी केली आहे. या दोन आघाडीमध्ये लढत होत आहे. दिवसभर दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर थांबून होते. सहायक निबंधक युसुफ शेख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
...
चौकट