
गारगोटी : हुतात्मा सूतगिरणी निवडणूक
हुतात्मा स्वामी-वारके
सूतगिरणीसाठी ३१ अर्ज दाखल
गारगोटी, ता. १३ : मुदाळ (ता. भुदरगड) येथील हुतात्मा स्वामी-वारके सहकारी सूतगिरणीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. २१ जागांसाठी ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
निवडणुकीत कापूस उत्पादक गटातून ११, बिगर कापूस उत्पादक गटातून ५ व इतर राखीव गटातून ५ अशा एकूण २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २३ मे अर्ज माघारीचा दिवस आहे. ३१ मे रोजी मतदान व १ जूनला मतमोजणी होणार आहे. सूतगिरणीचे संस्थापक के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचाही उमेदवारी अर्ज दाखल आहे. विद्यमान अध्यक्ष पंडितराव केणे, संचालक सुरेशराव सूर्यवंशी, तात्यासाहेब जाधव, उमेश भोईटे, धोंडीराम वारके, आर. व्ही. देसाई, निवासराव देसाई, शिवानंद तेली, गणपतराव डाकरे, मनोज फराकटे, पंढरी पाटील, जगदीश पाटील, चंद्रकांत कोटकर, दत्तात्रय पाटील, बापूसो आरडे, विठ्ठलराव कांबळे, काका देसाई, रूपालीताई पाटील, सुजाता पाटील, मंगल आरडे, विकास पाटील, किरण पिसे यांनी अर्ज दाखल केले. सूतगिरणीची ८ हजार ३३६ सभासदसंख्या आहे. ‘ब’ वर्ग सभासदसंख्या ३१३ आहे. युसूफ शेख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.