गारगोटी : क्राईम चेन स्नँचिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : क्राईम चेन स्नँचिंग
गारगोटी : क्राईम चेन स्नँचिंग

गारगोटी : क्राईम चेन स्नँचिंग

sakal_logo
By

गारगोटीत महिलेच्या गळ्यातील
दीड तोळ्याची चेन हिसकावली

गारगोटी, ता. १९ : येथे महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला. शुक्रवारी दुपारी वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत भुदरगड पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, येथील अनुपमा अनिल शिंदे (वय ४९) यांचा शहरात हार विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास व्यवसाय आटोपून त्या जेवणासाठी घरी पायी जात होत्या. यावेळी इंजूबाई पाणंदनजीक गारगोटी- शेळोली मार्गावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेली. त्याची अंदाजे किंमत ७५ हजार रूपये इतकी आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ही महिला घाबरली होती. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यातील एकाने हेल्मेट घातले होते तर दुसऱ्याने काळे कापड बांधलेले दिसते.
...

चेन स्नँचिंग प्रकारात वाढ

गारगोटी शहरात चेन स्नँचिंगच्या घटना सतत घडत आहेत. अशा घटनेत महिलांबरोबर पुरूषांचीही लुबाडणूक झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतच्या तक्रारी पोलिसांत नोंद आहेत. दिवसाढवळ्या अशा घटना घडू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.