गारगोटी : विकास आराखडा बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : विकास आराखडा बैठक
गारगोटी : विकास आराखडा बैठक

गारगोटी : विकास आराखडा बैठक

sakal_logo
By

02991

किल्ले भुदरगड : येथील विकास आराखडा नियोजन बैठकीत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. शेजारी प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी आडसूळ आदी.
....

किल्ले भुदरगडचा विकास आराखडा करा

आमदार प्रकाश आबिटकर : अधिकाऱ्यांसमवेत गडावर नियोजन बैठक

गारगोटी, ता. १९ : ‘भुदरगड तालुक्याची अस्मिता आणि शिवकालीन ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले भुदरगडचे जतन व संवर्धन करण्यासाठी विकास आराखडा तयार करा’, अशी सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना केली.
किल्ले भुदरगड येथे उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी आडसूळ व शासकीय अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. यामध्ये किल्ले भुदरगडचा सर्वांगीण विकास व भैरवनाथ देवालयाचा जिर्णोद्धाराबाबत चर्चा झाली.
राज्य शासनाच्या ''ब'' वर्ग किल्ले संवर्धनमध्ये भुदरगड तालुक्यातील भुदरगड व रांगणा हे किल्ले आहेत. परंतु अनेक वर्षे या किल्ल्यांचे संवर्धन न झाल्याने किल्ल्यावरील जुनी मंदिरे, बुरुज, तटबंदी, विहिरी, तलाव यांच्यासह छुप्या वाटा, गुहा असे अनेक ऐतिहासिक ठेवे नामशेष होत आहेत. यासर्वांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. किल्ले भुदरगडवरील भैरवनाथ देवालय जिर्णोद्धार, सभामंडप, दुधीतळ्यातील गाळ काढणे व तलावाच्या ठिकाणी बोटिंग सुविधा, तळ्याभोवती पथमार्ग निर्मिती, फुलपाखरू उद्यान निर्मिती, वॉच टॉवर उभारणी, गडावरील ओसाड माळावर विविध जातींचे वृक्षारोपण करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्राचीन मंदिरे जीर्णोद्धार, दर्शन कमान निर्मिती, तसेच पुष्पनगर व मुरूक्टे फाटा येथे प्रवेशद्वार उभारणी करणे आदी बाबत विकास आराखडा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
गटविकास अधिकारी शेखर जाधव, पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे, उपअभियंता श्री. मिरजकर, उपअभियंता धनाजी कुंभार, वन अधिकारी श्री. शेवडे, जलसंधारण विभागाचे अविनाश पदमाळे, यशवंत नांदेकर, दौलतराव जाधव, सुनील निंबाळकर, सरपंच सुरेखा देऊलकर, उपसरपंच राजाराम सुतार, राणेवाडीच्या सरपंच स्वाती राणे, उपसरपंच विजय मोरे, माजी सरपंच बाळासाहेब वरणे, मारुती कांबळे, बाळ घाडगे आदी उपस्थित होते.
...