
गारगोटी : हुतात्मा सूतगिरणी बिनविरोध
हुतात्मा स्वामी-वारके
सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध
२१ जागांसाठी २१ अर्ज : स्थापनेपासून बिनविरोध निवडीची परंपरा कायम
गारगोटी, ता. २३ : मुदाळ (ता. भुदरगड) येथील हुतात्मा स्वामी-वारके सहकारी सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. आज माघारीदिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. १९९४ ला संस्थेच्या स्थापनेपासून सर्व निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत.सहायक निबंधक युसुफ शेख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सूतगिरणीची वाटचाल सुरू आहे. सहकारातील एक आदर्श सूतगिरणी म्हणून संस्थेने नावलौकिक मिळविला आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.
बिनविरोध निवड झालेले संचालक असे : कापूस उत्पादक सभासद गट : पंडितराव दत्तात्रय केणे, आनंदराव यशवंत पाटील, राजाराम विष्णू देसाई, दत्तात्रय शंकरराव देसाई, उमेश नामदेवराव भोईटे, तात्यासाहेब नारायणराव जाधव, सुरेशराव दत्तात्रय सूर्यवंशी, दत्तात्रय तुकाराम पाटील, शिवानंद आण्णाप्पा तेली, जगदीश गोविंद पाटील, विकास कृष्णराव पाटील.
बिगर कापूस उत्पादक सभासद गट : कृष्णराव परशराम पाटील, धोंडीराम गोपाळ वारके, मनोज गणपतराव फराकटे, पंढरीनाथ आनंदराव पाटील, काकासो तुकाराम देसाई.
महिला राखीव : रूपाली धैर्यशील पाटील,अलका सुनिल नलवडे. इतर मागास प्रवर्ग : बापूसो रामचंद्र आरडे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : विठ्ठल दत्तात्रय कांबळे. विमुक्त जाती-भटक्या जमाती : गणपती दत्तू डाकरे.