गारगोटी : मंत्री चंद्रकांत पाटील दौरा

गारगोटी : मंत्री चंद्रकांत पाटील दौरा

02993

खानापूर : येथील महिलांशी संवाद साधताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील.
....

''बिद्री'' त योग्यवेळी योग्य निर्णय

मंत्री चंद्रकांत पाटील : भुदरगड तालुक्यात धावता दौरा

गारगोटी, ता. २३ : ‘बिद्री येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. कारण अजून या निवडणुकीचे वारे कसे वाहते आणि ढग कसे येतात ते माहित नाही. हे चित्र पाहूनच निवडणुकीत काय करायचे ते ठरवू’, असे सूचक वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मंत्री पाटील यांनी भुदरगड तालुक्याचा धावता दौरा केला. भाजप नेते राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, अलकेश कांदळकर यांच्या घरी त्यांनी भेट दिली. तसेच खानापुरातील महिलांशी संवाद साधला. महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
खानापूर येथील भाजप नेते प्रविणसिंह सावंत यांच्या घरी आले असता ''बिद्री'' बाबत भाजप कोणती भूमिका घेणार असे विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले.
साडेतीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ''बिद्री'' च्या गतनिवडणुकीत भाजपची भूमिका महत्वाची ठरली होती. या निवडणुकीतही तितकीच महत्वाची ठरेल. कारण भाजपकडे कारखाना कार्यक्षेत्रात ताकदीचे नेते व सभासद आहेत. यामुळे मंत्री पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे सांगितले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी प्रा. सुनिल मांगले, माजी सरपंच विद्याताई सावंत, क्रांती मांगले, पार्थ सावंत आदी उपस्थित होते.

दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव व गारगोटी ग्रामपंचायतीचे सदस्य अलकेश कांदळकर यांच्या आईंचे नुकतेच अपघाती निधन झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कांदळकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com