गारगोटी : तालुका संघ अध्यक्ष निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : तालुका संघ अध्यक्ष निवड
गारगोटी : तालुका संघ अध्यक्ष निवड

गारगोटी : तालुका संघ अध्यक्ष निवड

sakal_logo
By

02997, 02996
...

भुदरगड तालुका संघाच्या
अध्यक्षपदी प्रा. बाळ देसाई

गारगोटी : येथील भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी प्रा. बाळ देसाई व उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या शामराव देसाई यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक युसुफ शेख निवड सभेच्या अध्यस्थानी होते. प्रा. देसाई यांचे अध्यक्षपदासाठी नाव संचालक प्रा. एच. आर. पाटील यांनी सुचविले तर उपाध्यक्षपदी शामराव देसाई यांचे नाव संचालक बजरंग सुतार यांनी सुचविले. या वेळी सर्व संचालक उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राष्ट्रवादीचे नेते पंडितराव केणे, मधुकर देसाई, विश्वनाथ कुंभार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी आर. व्ही. देसाई, प्रकाश कुलकर्णी, धोंडीराम मगदूम, अमित देसाई, राजू काझी, सुरेश नाईक, रामभाऊ कळंबेकर, प्रदीप पाटील, अजित देसाई, कल्याण निकम, सर्जेराव देसाई, संग्राम सावंत आदी उपस्थित होते. संचालक सम्राट मोरे यांनी स्वागत केले. व्यवस्थापक दत्तात्रय मांगोरे यांनी आभार मानले.