
गारगोटी : एम. एस. पाटील अध्यक्षपदी
भुदरगड तालुका मराठी अध्यापक
संघाच्या अध्यक्षपदी एम. एस. पाटील
गारगोटी : भुदरगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी दौलत विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एम. एस. पाटील यांची व उपाध्यक्षपदी प. बा. पाटील हायस्कूलचे शिक्षक एस. डी. खतकर यांची बिनविरोध निवड झाली. कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ अंतर्गत या संघाची स्थापना केली आहे. या जिल्हास्तरीय संघामार्फत विविध उपक्रम, कार्यशाळा, चर्चासत्र, ऑनलाईन कार्यशाळा, परिसर अभ्यास, अभ्यास सहली अशा विविध उपक्रमांचे आयोजन करुन मराठी भाषा वृंद्धिगत करण्यासाठी केले जाते. आर. पी. गव्हाणकर यांची सचिवपदी, ए. पी. नलवडे यांची खजानिसपदी तर एस. बी. पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य असे: ए. ए. पाटील, बी. एस. माने, एम. एस. मुसळे, एस. के. करडे, बी. डी. कुरळे, एस. पी. डेळेकर, वाय. पी. बिरंबोळे, पी. पी. देसाई. सल्लागार एम. व्ही. लाड, पी. एल. येजरे.