गारगोटी : दलितवस्तींना निधी
१२५ गावांतील दलितवस्तींना एलईडी
पोल मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर
गारगोटी, ता. ९ : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील १२५ गावांतील दलितवस्त्यांना एलईडी पोल मंजूर झाले आहेत. यामुळे दलितवस्त्या प्रकाशाने उजळणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राधानगरी तालुक्यातील ४५, भुदरगड तालुक्यातील ५५ व आजरा तालुक्यातील २५ असे एकूण १२५ गावांतील दलित वस्तीमध्ये एलईडी दिवे मंजूर आहेत. राधानगरी तालुक्यातील नरतवडे, ढेंगेवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, सरवडे भैरी देवालय, धामणवाडी, फराळे, धामोड, कोनोली तर्फ असंडोली, केळोशी खुर्द पिंपरीचीवाडी, बुरंबाळी, गवशी, शेळेवाडी, कुऱ्हाडवाडी, तिटवे, चंद्रे, कपिलेश्वर, तुरंबे, ठिकपुर्ली, कसबा वाळवे, राशिवडे बुद्रुक, येळवडे, आडोली, सोन्याची शिरोली, गुडाळवाडी, पिरळ, कांबळवाडी, शिरगांव, तरसंबळे, तारळे खुर्द, आवळी बुद्रुक, कौलव, घुडेवाडी, कसबा तारळे, पुंगाव, आवळी खुर्द, पाल बुद्रुक, खामकरवाडी, म्हासुर्ली पैकी बाजारीचावाडा, सुळंबी, ऐनीपैकी धनगरवाडा, लिंगाचीवाडीपैकी हरिजनवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, फराळेपैकी डवरवाडी आदी गावांचा समावेश आहे.
भुदरगड तालुक्यातील कडगाव, दोनवडे, वेंगरुळ, दोनवडे, शेळोली, कोरीवडे, ममदापूर, एरंडपे, देवर्डे, मोरेवाडी, भाटीवडे, मिणचे बुद्रुक, शेणगाव, आकुर्डे, शिरगांव, लोटेवाडी, पाळेवाडी, देवकेवाडी, नाधवडे, मुदाळ, आदमापूर, मडिलगे बुद्रुक, गंगापूर, वाघापूर, वेंगरुळ, टिक्केवाडी, निळपण, महालवाडी, काळम्मावाडी, फयेपैकी हांड्याचावाडा, फयेपैकी सोनबाचावाडा, बसुदेव धनगरवाडा, मोरस्करवाडी, शिवडाव, पाटगांव, बशाचामोळा, सोनुर्ली, नवले, कुडतरवाडी, म्हासरंग, उकीरभाटले, डेळे, अंतिवडे, व्हनगुती, गंगापूर, हेळेवाडी, मानवळे, कुंभारवाडी, जकीनपेठ, वर्पेवाडी, राणेवाडी, शिंदेवाडी, सालपेवाडी, बेगवडे, मडूर आदी गावांचा समावेश आहे.
आजरा तालुक्यातील देवर्डे, देवकांडगाव, वेळवट्टी, एरंडोल, हारपवडे, साळगांव, पेरणोली नावलकरवाडी, पेरणोली धनगरवाडा, इटे, विनायकवाडी, भादवण, खेडे, दर्डेवाडी, हाजगोळी बुद्रुक, हाजगोळी खुर्द, चांदेवाडी, मुंगूसवाडी, मेढेवाडी, दाभिलवाउी, एरंडोल, देऊळवाडी, हरपवडे, कोरीवडे नार्वेकरवस्ती, मेढेवाडी, सातेवाडी आदी गावांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

