खड्डयांत वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डयांत वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध
खड्डयांत वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध

खड्डयांत वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध

sakal_logo
By

01588
देवाळे (ता. करवीर) ः येथे खड्डयांत वृक्षारोपण करताना नागरिक.

खड्डयांत वृक्षारोपण;
देवाळेत आंदोलन
---
युवकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध
हळदी, ता. १८ ः देवाळे (ता. करवीर) येथे राधानगरी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीचे अपघात होत आहेत. तसेच, वाहतुकीस मोठा अडथळा होत असूनही हे खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार कंपनी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे येथील युवकांनी खड्ड्यांत वृक्षारोपण करून बांधकाम विभाग व कंत्राटदार कंपनीचा निषेध केला. कांडगाव ते देवाळेदरम्यान असलेल्या रस्त्याची कोणतेही दुरुस्तीचे काम झालेले नाही. सुरुवातीपासून असलेले खड्डे आता पावसामुळे रुंद आणि खोल झाले आहेत. त्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. एकापाठोपाठ अनेक खड्डे रस्त्यावर असल्याने अनेक वाहनधारक उलट्या दिशेने प्रवास करतात. परिणामी, अपघात घडत आहेत. याबाबत संबंधित कंत्राटदार कंपनीचे वरिष्ठ कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. पण, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष जाऊन किमान रस्ता वाहतुकीयोग्य व्हावा, या उद्देशाने गावातील युवकांनी खड्ड्यांत वृक्षारोपण करून बांधकाम विभाग व कंत्राटदार कंपनीचा निषेध केला.
या वेळी उपसरपंच संजय धुमाळ, सर्जेराव पाटील, उत्तम पाटील, तानाजी पाटील, विशाल पाटील, दत्तात्रय पाटील, संग्राम पाटील, सरदार पाटील, आकाश सुतार उपस्थित होते.

01588

Web Title: Todays Latest Marathi News Hld22b00990 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top