बनावट वेबसाईटवरून एकाला ऑनलाइन गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट वेबसाईटवरून एकाला ऑनलाइन गंडा
बनावट वेबसाईटवरून एकाला ऑनलाइन गंडा

बनावट वेबसाईटवरून एकाला ऑनलाइन गंडा

sakal_logo
By

भामट्याने घातला
२८,७५१ रुपयांना गंडा
सिमकार्ड महागात; वेबसाईट बनावट
हळदी, ता. २४ ः मोबाईल सिमकार्ड कंपनीच्या बनावट वेबसाईटवरून एका कुटुंबाला जवळपास २८ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालून भामट्याने फसवणूक केल्याची घटना करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात घडली. फसणुकीबाबत कुटुंबाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी, संबंधित कुटुंबाकडील मोबाईलच्या नेटवर्कला अडचण येत होती. कुटुंबातील एका सदस्याने संबंधित कंपनीच्या कॉल सेंटरचा नंबर गुगलवर शोधला. त्यावेळी सिमकार्ड कंपनीच्या नावाने असलेल्या बनावट वेबसाईटवरील एक मोबाईल नंबर कस्टमर केअर नंबर म्हणून मिळाला. त्याने त्या क्रमांकावर संपर्क केला असता पलीकडील व्यक्तीने मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन घेण्यास सांगितले. ॲप्लिकेशन घेतल्यानंतर संबंधिताला नंबर दिला आणि त्या ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांनी नकळत त्या कुटुंबाच्या मोबाईलचा ताबा घेतला. त्यांना बोलण्यात गुंतवून पासवर्ड घेत पहिल्या टप्प्यात ५ हजार रुपये बँक खात्यातून काढून घेतले. त्यावेळी ती व्यक्ती बँकेत गेली असता सर्व्हर डाउनमुळे माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीन वेळा प्रत्येकी ५ हजार रुपये व एकदा ८७५१ रुपये खात्यातून हडप केली. आदल्या दिवशीचे ५ हजार व दुसऱ्या दिवशीचे २३,८५१ रुपये, असे मिळून दोन दिवसांत २८,७५१ रुपये खात्यातून काढून घेतल्याचे संदेश आले. बँकेत चौकशी केली असता संबंधितांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर संबंधित कुटुंबाने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंद केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Hld22b01019 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..