नंदवाळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन - ऑनलाईन साठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंदवाळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन - ऑनलाईन साठी
नंदवाळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन - ऑनलाईन साठी

नंदवाळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन - ऑनलाईन साठी

sakal_logo
By

नंदवाळच्या डोंगरात
वावरणारा तो प्राणी तरस
वनविभागाची पाहणी; अफवांना मिळाला पूर्णविराम
हळदी, ता. १४ ः नंदवाळ (ता.करवीर) येथील नंदवाळ व कांडगावच्या हद्दीवर डोंगर परिसरात आज सकाळी बिबट्यासदृश प्राणी दिसल्यानंतर परिसरात बिबट्या किंवा वाघ असल्याची अफवा पसरली होती; पण सकाळी दिसलेला तो प्राणी तरस असल्याचे वन विभागाच्या पथकाने सांगितल्याने वाघ असल्याच्या अफवेला पूर्ण विराम मिळाला.
याबाबत माहिती अशी, नंदवाळ-कांडगावच्या हद्दीवर नागटेक डोंगर परिसरात बुधवारी सकाळी नंदवाळ येथील शेतकरी बाजीराव शिंदे यांना शेताकडे जाताना त्यांच्या शेताच्या बांधावर प्राणी बसलेला दिसला. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना तसेच ग्रामप्रशासनाला दिली. ग्रामप्रशासनाने नंदवाळसह शेजारील कांडगाव, जैताळ, वाशी गावातील शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. ग्रामसेवक उत्तम पाटील यांनी वनविभागाला माहिती दिली. वनखात्याचे पथक तपासासाठी नंदवाळ-कांडगाव परिसरात दाखल झाले. वनक्षेत्रपाल विजय पाटील, रमेश कांबळे, वनरक्षक राहुल झेनवाल आणि रेस्क्यू टीमच्या वतीने याबाबत पाहणी केली.तिथे सापडलेल्या पायांच्या ठशावरून हा प्राणी तरस असल्याचे वन विभाग व रेस्क्यू फोर्सकडून सांगण्यात आले. बिबट्यासदृश प्राणी आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते; पण तो तरस असून ग्रामस्थांनी घाबरू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे. परिणामी तो प्राणी वाघ असल्याच्या परिसरात पसरलेल्या अफवेला पूर्णविराम मिळाला.

Web Title: Todays Latest Marathi News Hld22b01039 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..