गाडेगोंडवाडी येथे सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाडेगोंडवाडी येथे सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता
गाडेगोंडवाडी येथे सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता

गाडेगोंडवाडी येथे सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता

sakal_logo
By

गाडेगोंडवाडीत ‘स्वच्छ भारत मिशन’
हळदी ः गाडेगोंडवाडी (ता.करवीर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने केंद्रशासनाच्या १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबरपर्यंत असणाऱ्या स्वच्छ भारत मिशन या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाभोवतीचा परिसर, गावातील चौकाची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच केराबाई वरुटे, उपसरपंच शुभांगी मिठारी, मुख्याध्यापिका माया भिसे, अंगणवाडी सेविका कांचन शिरसेकर, मानसी बुडके, मेघना मेटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून स्वच्छतेचे महत्व याविषयी प्रबोधन केले. तसेच ग्रामस्थांकडून स्वच्छतेची शपथ घेतली. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, संभाजी मेटील, ग्रामसेवक एम. बी. तिवले, महादेव पोवार, दिगंबर पाटील, बी. डी. चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Hld22b01049 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..