पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५
पान ५

पान ५

sakal_logo
By

भोगावतीवरील वाढलेल्या
कर्जाचा जाब विचारणार ; पाटील


हळदी, ता २५ ः भोगावती साखर कारखान्याचा कारभार काटकसरीने केला म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत निकृष्ट साहित्याची खरेदी करत प्रत्येक टनामागे उत्पादन खर्च वाढवून कारखान्यावर साडेतीनशे कोटींपेक्षा जास्त कर्जाचा बोजा केला, याचा जाब वार्षिक सभेत विचारणार असल्याचे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील यांनी सांगितले. ते कोथळी (ता.करवीर) येथे भोगावती कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय विरोधी गटाच्या सभेत बोलत होते.
ते म्हणाले, सत्ताधारी व विरोधकांच्या कार्यकाळातील कारभाराची, कर्जाची आणि कर्जाच्या व्याजाची एका व्यासपीठावर तुलनात्मक चर्चा करण्यास तयार आहोत.
सदाशिव चरापले म्हणाले, सत्ता आल्यानंतर शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ मंडप घालून साखर विक्रीची जाहीर निविदा काढू, असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी कारखाना कर्जाच्या खाईत लोटला. धैर्यशील पाटील म्हणाले, दोन वर्षांतील ऑनलाईन वार्षिक सभेत विरोधकांची मुस्कटदाबी करून सभासदांच्या हिताचा गळा घोटला आहे. अशोकराव पवार पाटील म्हणाले, सभासदांच्या सवलतीची सत्तर टन साखर चोरुन विकली असून विद्यामन अध्यक्षांना प्रश्न विचारायचा अधिकार एकाही संचालकाला नाही. हंबीरराव पाटील म्हणाले, विद्यमान संचालकांनी कारखान्यातील स्क्रॅपचे वजन न करता एकूण स्क्रॅपचे अंदाजे वजन ठरवून स्क्रॅप विक्रीतून मलई खाल्ली. भोगावतीचे विद्यमान अध्यक्ष राजीनामा देतो, राजकारण सोडतो, अशी भाषा वापरून सभासदांची दिशाभूल करत आहेत. त्यांची ही भाषा म्हणजे राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका भोगावतीचे विद्यमान संचालक दत्तात्रय मेडसिंगे यांनी आमदार पी. एन. पाटील यांच्या कालच्या सभेतील वक्तव्यावर केली.

बाबासाहेब देवकर, गोकुळचे संचालक किसन चौगले, श्रीपती पाटील, अजित पाटील, तानाजी डोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
नामदेवराव पाटील, रघुनाथ जाधव, वसंतराव पाटील, बबन पाटील, उदय चव्हाण, उत्तम पाटील, शामराव मुळीक, अमित कांबळे, तुकाराम खराडे, अभिजित मेटील उपस्थित होते.
--