पाण्याअभावी चार हजार एकरातील पिके होरपळून जाण्याचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याअभावी चार हजार एकरातील पिके होरपळून जाण्याचा धोका
पाण्याअभावी चार हजार एकरातील पिके होरपळून जाण्याचा धोका

पाण्याअभावी चार हजार एकरातील पिके होरपळून जाण्याचा धोका

sakal_logo
By

बिल भरूनही वीज जोडण्या
पूर्ववत करण्यास टाळाटाळ

साईनाथ पाटील ः सकाळ वृत्तसेवा
हळदी, ता. ४ ः ‘महावितरण’च्या फुलेवाडी (ता. करवीर) उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभाराचा फटका आठ गावांच्या जवळपास चार हजार एकरांहून अधिक पीकक्षेत्राला बसत असून पाण्याअभावी उन्हामुळे पिके होरपळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
फुलेवाडी ग्रामीण-१ उपविभागांतर्गत देवाळे, हळदी, सडोली खालसा, कांडगाव, जैताळ, वाशी, शेळकेवाडी व कळंबा गावांतील पाणीपुरवठा संस्थांना वीजपुरवठा केला जातो. पावसाळ्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात ‘महावितरण’कडून वीज जोडण्या बंद करून नदीकाठावरील वीजयंत्रे काढून ठेवली होती. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणीपुरवठा संस्थांचा वीज पुरवठा पूर्ववत केला जात आहे. वरील ८ गावांपैकी देवाळे व जैताळ येथील संस्थांची वीज बिले प्रत्येक महिन्याला भरली जातात. तसेच सद्यःस्थितीत ज्यांची बिले थकित आहेत, अशा संस्थांना ठराविक रक्कम भरून वीज जोडण्या सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार सर्वांनी ८ सप्टेंबरपर्यंत रक्कम जमा केली आहे. मात्र, तत्काळ वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन देऊन आठवडा होत आला तरी वीज जोडण्या झाल्या नाहीत. याबाबत संस्थांनी ‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र दिले. त्यांनी फुलेवाडी कार्यालयात फोन करून जोडण्या पूर्ववत करण्याच्या सूचना देऊनही वीज जोडणी झालेली नाही.

कोट
पाणीपुरवठा संस्थांची वीज जोडणी सुरू करण्याबाबत वरिष्ठांकडून सूचना मिळताच अंतर्गत असणाऱ्या संबंधित विभागाला तशा सूचना दिल्या आहेत, तरीही वीज पुरवठा सुरू झाला नसेल तर पुन्हा सक्त ताकीद देऊन तत्काळ वीजजोडणी केली जाईल.
-एस. बी. मरळी, उपकार्यकारी अभियंता, फुलेवाडी उपविभाग