सडोलीत गोवंश संवर्धनाचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सडोलीत गोवंश संवर्धनाचा संदेश
सडोलीत गोवंश संवर्धनाचा संदेश

सडोलीत गोवंश संवर्धनाचा संदेश

sakal_logo
By

सडोलीत गोवंश संवर्धनाचा संदेश
हळदी : सडोली खालसा (ता. करवीर) येथे वसुबारस साजरी करण्यात आली. येथील गायवासरू व बैलजोडी शेतकरी मंडळातर्फे गावातील देशी गोवंशाची पूजा करण्यात आली. डोंगरी काळी गाय, गाजरी खिलार, पंढरपुरी खिलार व काळी गाय, गीर, देशी गायी व कालवडींचे पूजन झाले. गावातून शोभायात्रा काढून गोवंश संवर्धनाचा संदेश दिला. मंडळाचे कार्याध्यक्ष रवींद्र मगदूम, राहुल शेलार, दगडू साळोखे, बबलू काशीद, कृष्णात वास्कर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या वेळी सरपंच अमित पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, राजेंद्र मगदूम, संगीता मगदूम, धनाजी कुंभार, श्रीकांत चव्हाण, एकनाथ कुंभार उपस्थित होते.