देवाळे येथे गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवाळे येथे गुणवंतांचा सत्कार
देवाळे येथे गुणवंतांचा सत्कार

देवाळे येथे गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

गणपतराव पाटील यांना अभिवादन
हळदी ः देवाळे (ता. करवीर) येथील गणपतराव रामचंद्र पाटील सहकार समूहाच्या वतीने गणपतराव रामचंद्र पाटील यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक वसंतराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय स्टुडंट ऑलिंपिक खो-खो स्पर्धेत रौप्यपदक मिळविलेल्या गावातील रोहन पाटील, शुभम पाटील, अथर्व पाटील व आयूष पाटील, तसेच राष्ट्रीय वुशू स्पर्धेत कास्यपदक मिळवल्याबद्दल संकेत पाटील, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या अनुष्का पाटील, तर प्रज्वल पाटील व दीक्षा कांबळे यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच संजय धुमाळ यांची कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व एम. जी. पाटील यांची बलभीम विकास सेवा संस्थेत संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांचा गौरव करण्यात आला. महालक्ष्मी विकास संस्थेचे अध्यक्ष रंगराव पाटील, महालक्ष्मी दूध संस्थेचे अध्यक्ष श्रीपती धुमाळ, सर्जेराव पाटील, हिंदूराव पाटील, अरुण पाटील, वसुली अधिकारी घोरी, शंकर धुमाळ, दिलीप पाटील, बाजीराव पाटील, धनाजी धुमाळ, बाजीराव शेळके उपस्थित होते.