नंदवाळ येथे कार्तिक यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंदवाळ येथे कार्तिक यात्रा
नंदवाळ येथे कार्तिक यात्रा

नंदवाळ येथे कार्तिक यात्रा

sakal_logo
By

नंदवाळला आज कार्तिक एकादशी यात्रा
हळदी ः प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळ (ता.करवीर) येथे शुक्रवारी कार्तिक एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा जमणार आहे. हरिनामाचा गजर करत पंचक्रोशीसह शेजारच्या तालुक्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या उद्या येथे विठ्ठल भेटीसाठी येणार आहेत. मागील दोन कार्तिकी एकादशीवेळी कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे कार्तिक एकादशी यात्रा साधेपणाने साजरी केली होती. यंदा तसे निर्बंध नसल्याने सर्व भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, पहाटे चारच्या सुमारास विठ्ठलाचा अभिषेक व पूजा होईल. येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतमार्फत दर्शनरांग, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था व परिसराची स्वच्छता केली आहे. तसेच यात्रेत अनुचित घटना घडू नये म्हणून इस्पुर्ली पोलिस ठाण्यातर्फे पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. याबरोबरच दानशूर भाविकांमार्फत वारीनिमित्त येणाऱ्यांसाठी अल्पोपहार व फराळाची व्यवस्था केली आहे.