विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांची धडपड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांची धडपड
विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांची धडपड

विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांची धडपड

sakal_logo
By

विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांची धडपड
पटसंख्या टिकवण्याचे आव्हान; मान्यता रद्द होण्याची टांगती तलवार
अतुल मंडपे : सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. ९ : कोरोनात बंद राहिलेल्या अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळांसह महाविद्यालयांनाही विद्यार्थी संख्येचा प्रश्न भेडसावू लागला आहे. पटसंख्या टिकवण्याचे आव्हान बहुतेक शाळांसमोर असल्याने विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांची रस्त्यावर उतरून धडपड सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
हातकणंगले तालुक्यांत सरकारी व खासगी मिळून ५६८ शाळा आहेत. त्यामध्ये एक लाख बावन्न हजार एकशे सतरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मुलांची संख्या ८३ हजार ७० तर मुलींची संख्या ६९ हजार ४७ आहे. विद्यार्थ्यांमागे दोन हजार ३७८ शिक्षक तर दोन हजार ४९४ शिक्षिका असे एकूण ४ हजार ८७२ शिक्षक कार्यरत आहेत. दोन वर्षे कोरोनात बहुतेक सर्व शाळा शासन आदेशानुसार बंद होत्या. अनेक शाळांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. आता कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा खुले झाले आहेत. मात्र आता सर्वच शाळांना विद्यार्थ्यांची उणीव जाणवू लागली आहे. विशेषतः कोरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक घडी विस्कटल्याने भरमसाठ फी आकारणाऱ्या खासगी शिक्षण संस्थांपेक्षा सरकारी शाळांकडे पालकांचा किंबहुना विद्यार्थ्यांचा कल वाढू लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
विद्यार्थ्यांच्या प्रवेश संख्येकडे नजर टाकल्यास तालुक्यांत २०१८-१९ मध्ये ३३६२, २०१९-२० मध्ये ३२१३ आणि २०२०-२१ मध्ये ३०४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अपेक्षित पटसंख्या टिकली नाही तर काही वर्गांची किंवा शाळांचीही मान्यता रद्द होण्याची टांगती तलवार असल्याने संस्था चालकांकडून विद्यार्थी मिळवण्याचे टार्गेट शिक्षकांसमोर ठेवले आहे. त्यामुळे शिक्षकांकडून विद्यार्थी मिळवण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू आहे. गल्लोगल्ली, घरोघरी जाऊन ते विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी विनवण्या करत आहेत.
---------------
खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांकडे कल वाढत चालला आहे. तरीही शासन नियमानुसार पटसंख्या गरजेचीच आहे. ज्या शाळा पटसंख्या राखू शकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई अटळ आहे.
-प्रवीण फाटक, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, हातकणंगले

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01817 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top