मुस्लिम समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुस्लिम समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय
मुस्लिम समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय

मुस्लिम समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय

sakal_logo
By

मुस्लिम समाजाच्या मागण्यांसाठी
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय
हातकणंगले, ता. ६ ः मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत. मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्याचा निर्णय आज मुस्लिम एबीसी व ओबीसी संघटनांच्या बैठकीत घेतला. यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. मुस्लिम समाजाने नेहमीच काँग्रेस, राष्ट्रवादी व महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र महामंडळ, शासकीय कमिटीवर निवडी करताना मुस्लिम समाजाला डावलले जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, मौलाना आझाद महामंडळासही निधी मिळावा, अशी मागणी केली.
बैठकीस हाजी शकील अत्तार, जहाँगीर हजरत, हिम्मत बारगीर, अन्सार देसाई, शब्बीर कलावंत, अझर तहसीलदार, अरिफ खतीब, साहिल मुल्ला, अलतमश हजरत, नसिर जमादार, शौकत शिगावे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01860 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top