
हिवरखान मंदिरास ब वर्ग दर्जा देऊ
02563
------------
हिवरखान मंदिरास ब वर्ग दर्जा देऊ
पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन; सागर पुजारी यांची माहिती
हातकणंगले, ता. ९ ः कुंभोज (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत हिवरखान बिरदेव मंदिरास ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ, असे आश्वासन पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यशवंत सेनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष सागर पुजारी यांना दिले. तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे आदेशही त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
कुंभोज परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. बहुतांशी स्थळांना पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मात्र हिवरखान बिरदेव मंदिर बाजूला पडले होते. धनगर समाजाची वारंवार मागणी होत होती. परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे धनगर समाजातून नाराजी व्यक्त होत होती. याची दखल घेत यशवंत सेनेचे तालुकाध्यक्ष सागर पुजारी यांनी मंत्रालयाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू केला. पुजारी यांनी तटकरे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती पटवून देत मंदिर आणि परिसराची भौगोलिक माहिती त्यांच्यासमोर मांडली. मंत्री तटकरे यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01864 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..