पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

साजणीतील युवतीची
गळफास घेऊन आत्महत्या
---
घातपाताचा आरोप; पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
हातकणंगले, ता. १३ ः साजणी (ता. हातकणंगले) येथील युवतीने एका खासगी रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना काल (ता. १२) रात्री उशिरा उघडकीस आली. याबाबतची फिर्याद तिच्या आईने हातकणंगले पोलिसांत दिली. दरम्यान, युवतीची आत्महत्या नसून, घातपात असल्याचा आरोप करीत दोषींवर गुन्हा दाखल करावा, यासाठी नातेवाइकांनी हातकणंगले पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवती काही वर्षांपासून एका डॉक्टरकडे रुग्णालयात साफसफाईचे काम करीत होती. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून युवतीने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित युवतीच्या आई-वडिलांनी रीतसर अंत्यविधी केला. आज सकाळी हातकणंगले पोलिसांत संबंधित डॉक्टरविरुद्ध तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. युवतीच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यासमोर येऊन ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरसह अन्य कोणी जबाबदार आहे का, याची चौकशी करून त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पोलिसांनी युवतीच्या नातेवाइकांना समजावून सांगून योग्य त्या कारवाईचे आश्‍वासन देत डॉक्टरवर गुन्हा दाखल केला. हातकणंगले पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01923 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..