मी कोणताही पक्ष , आघाडी सोबत जाणार नाही.. मा. खा. राजू शेट्टी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मी कोणताही पक्ष , आघाडी सोबत जाणार नाही.. मा. खा. राजू शेट्टी..
मी कोणताही पक्ष , आघाडी सोबत जाणार नाही.. मा. खा. राजू शेट्टी..

मी कोणताही पक्ष , आघाडी सोबत जाणार नाही.. मा. खा. राजू शेट्टी..

sakal_logo
By

लोकसभा स्वाभिमानी
स्वबळावरच लढणार
माजी खासदार शेट्टी; सोबत येणाऱ्यांचा विचार करू
हातकणंगले, ता. १६ ः कोणताही पक्ष, आघाडीसोबत मी जाणार नाही, तर आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनच लढणार आहे. देशभरातील शेतकरी आणि कार्यकर्ते, मतदार हीच माझी ताकद आहे. त्यामुळे ज्यांना सोबत यायचे आहे, पाठिंबा द्यायचा असेल, त्यांचा जरूर विचार केला जाईल, असे स्पष्ट मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. येथील एका विवाह सोहळ्यास उपस्थित शेट्टी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते.
२००९ मध्ये श्रीमती निवेदिता माने यांना पराभूत करत पहिल्यांदा शेट्टी खासदार झाले. २०१४ मध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे यांना सुमारे पावणेदोन लाख मतांनी पराभूत करून ते दुसऱ्यांदा खासदार झाले. २०१९ मध्ये त्यांचा विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी पराभव केला.
दोन महिन्यांत राज्यांत झालेल्या उलथापालथीनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि शेट्टी एकत्रित लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत शेट्टीशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘कोणीही, काहीही चर्चा करू देत; यावेळी कोणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही. विविध पक्षांनी माझा सोयीनुसार वापर करून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक बळ, ताकद देण्यासाठी या वेळी एकटाच लढणार आहे. कोणत्याही पक्ष, आघाडीसोबत जाणार नाही. शेतकरी, मतदार माझ्या पाठीशी आहेत. तीच शिदोरी घेऊन सर्वांसमोर जाणार आहे. ज्यांना सोबत यायचे असेल, पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी जरूर यावे, त्यांचा नक्कीच विचार करू.’’

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01924 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..