पान ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ४
पान ४

पान ४

sakal_logo
By

हातकणंगले तालुका विभाजनाविरोधात
आज गाव बंद, मोर्चाचे आयोजन

हातकणंगले, ता. २८ ः हातकणंगले तालुक्याचे तुकडे करण्याचा घाट काही लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी घातला आहे. त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. अशा लोकप्रतिनिधींना गावात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला. तालुका विभाजनाच्या विरोधात उद्या (ता. २९) गाव बंद ठेवून हातकणंगले बाजारपेठ येथून मोर्चाने तहसीलदारांना हातकणंगले तालुका विभाजन रोखण्यासंदर्भात निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत झाला.
२० वर्षांपूर्वी याच लोकप्रतिनिधींनी तालुका इचलकरंजीला हलवण्याचा घाट घातला होता. यावेळी नागरिकांनी एकजुटीने विरोध करत साखळी उपोषणे, निवेदने, शेजारील ग्रामपंचायतींचे ठराव करून हा घाट हाणून पाडला होता. त्याच पद्धतीने याही वेळी सर्वजण एकत्र येऊन अशा पद्धतीचा घाट हाणून पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळच्या परिस्थितीचा संदर्भ देत हातकणंगले तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून हातकणंगले मध्यभागी असल्याने दळणवळणाच्या सर्व सुविधा आहेत. राजकीय स्वार्थासाठी तालुका विभाजन करून श्रेय मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या तालुक्याचे विभाजन कोणत्याही परिस्थितीत होऊ न देणे सर्वांचे कर्तव्य आहे, अशी भूमिका बैठकीत सर्वांनी घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01940 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..