पंचगंगा कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार
पंचगंगा कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार

पंचगंगा कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार

sakal_logo
By

02706

-------------------
पंचगंगा कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार
अध्यक्ष पाटील यांची वार्षिक सभेत घोषणा; देयदेणीही देणार
हातकणंगले, ता. १५ ः कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ४८०० वरून वाढवून येत्या हंगामापासून ७५०० मेट्रीक टन केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या शासनाने दिल्या आहेत. त्याचबरोबर कामगारांच्या पगारातील फरकाची १९ कोटी रुपयांची रक्कम देय आहे. त्यापैकी पन्नास टक्के रक्कम या महिन्यांत संबंधित कामगारांना अदा केली जाईल. उर्वरित रक्कम हंगामानंतर देण्याची घोषणा देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केली.
कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘जिल्हयातील धरणे बांधण्यात पंचगंगा कारखान्याचा सिंहाचा वाटा आहे. अकरा वर्षांत रेणूका शुगर्सने कारखान्यातील यंत्रसाम्रगी बदलण्याबरोबरच कारखान्यांतील इतर सुधारणांसाठी १०० कोटी रूपये खर्च केले आहेत.’
पूर्वी कामगारांची संख्या ९०५ होती ती आता केवळ २४० वर आणली असून कमी खर्चात, काटकसरीने कारखाना चालवला जात आहे. दसरा दिवाळीची साखर ३० ऑक्टोबरपासून नोव्हेंबरपर्यंत वाटप केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रावसाहेब भगाटे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. प्रताप उर्फ बाबा पाटील यांनी आभार मानले.
------------
एकरकमी एफआरपीचा ठराव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सागर शंभू शेटे यांनी एकरकमी एफआरपी देण्याच्या ठराव मांडला. त्याला सभासदांनी हात उंचावून मंजूरी दिली. यावर याबाबत मासिक सभेत ठराव करून शासनांकडे प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन चेअरमन पी. एम्. पाटील यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01953 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..