हेरले ग्रा.पं. घोटाळा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेरले ग्रा.पं. घोटाळा..
हेरले ग्रा.पं. घोटाळा..

हेरले ग्रा.पं. घोटाळा..

sakal_logo
By

दोषींवर फौजदारीसाठी आयुक्तांकडे तक्रार
बाळगोंडा पाटील; हेरले ग्रामपंचायतीत कचरा कुंडी खरेदीमध्ये घोटाळा
हातकणंगले, ता. २३ ः हेरले (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी केलेल्या कचरा कुंडीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारामध्ये कंत्राटदाराला दोषी धरून १ लाख २३ हजार १४० रुपये वसुलीचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र, कचरा कुंडी खरेदीसाठी ४ लाख ९९ हजार १४० रुपयांचा खर्च दाखवला आहे. त्यामुळे वसुली आदेश व खरेदी किंमत यांचा मेळ लागत नाही. खरेदी करणाऱ्या सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, यासाठी विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार अर्ज केल्याची माहिती बाळगोंडा जिनगोंडा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘हेरले ग्रामपंचायतीमध्ये कचरा कुंडी खरेदीत सुमारे तीन लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून त्याचे मूल्य कमी केले. तक्रारीनंतर तपास अधिकारी यांनी १ लाख २३ हजार १४० रुपये वसुलीचा आदेश दिला आहे. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे भ्रष्टाचार होईल तेथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई व्हावी, या मागणीसाठी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.’
यावेळी निलोफर खतिब, अमर वडर, अमित पाटील, अशफाक देसाई, विशाल परमाज, सचिन जाधव, संताजी खाबडे आदी उपस्थित होते.

ग्रामसभेला सरपंच गैरहजर
आयोजित ग्रामसभेला सरपंच गैरहजर होते; पण ग्रामसभेने संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव एकमताने केला.

कोट
पुरवठादारांना नोटीस लागू केलेली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागितल्याचे पत्र ग्रामपंचायतीला सादर केले आहे.
- अश्विनी चौगुले, सरपंच

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01963 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..