मुंबई पोलिस तपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिस तपास
मुंबई पोलिस तपास

मुंबई पोलिस तपास

sakal_logo
By

प्रतिज्ञापत्रांबाबत हातकणंगले
पोलिस ठाण्यात चौकशी
हातकणंगले ः उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्या शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. त्यांची प्रतिज्ञापत्रे खरी की खोटी याची चौकशी मुंबई क्रॉईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात सुरू केली आहे. हातकणंगले परिसरातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. त्या शिवसैनिकांना घेऊन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आणि विजय देवणे दुपारी हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस ठाण्यामध्ये मुंबई क्रॉइम ब्रँचच्या पथकाकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यांचे आधार कार्ड, त्यातील मजकूर यांची शहानिशा केली जात होती.