पोलिसांकडून छेडछाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांकडून छेडछाड
पोलिसांकडून छेडछाड

पोलिसांकडून छेडछाड

sakal_logo
By

पोलिसावर कारवाईसाठी
महिलेचा आत्मदहनाचा इशारा

विनयभंगाची तक्रार : हातकणंगले पोलिस ठाण्याबाहेरील प्रकार

हातकणंगले, ता. २१ : दाखल गुन्ह्यांत मदत करण्याचे आश्वासन देऊन नरंदे येथील महिलेला अश्‍‍लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी महेश माने याच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी संबंधित महिलेने हातकणंगले पोलिस ठाण्याबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर रामेश्वर वैंजणे यांनी चौकशी होईपर्यंत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची बदली करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या महिलेने आपली तक्रार मागे घेतली. मात्र या घटनेने दिवसभर खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी, नरंदे येथील तक्रारदार महिला आणि नातेवाईकांमध्ये २७ सप्टेंबर रोजी वाद झाला होता. या वादावादी प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगांने पोलिस कर्मचारी महेश माने याने संबंधित महिलेला पेठवडगाव-हातकणंगले रस्त्यावरील आळते खडी क्रशरजवळ गुरुवारी अडवून पैशाची मागणी केली. तसेच लज्जा निर्माण होईल असे बोलून विनयभंग केल्याची महिलेची तक्रार आहे. तसेच वारंवार फोन करून आणि प्रत्यक्ष बोलावून तिच्यासह पती व जाऊ यांना अश्‍‍लील शिवीगाळ केल्याचा आरोप या माहिलेने केला आहे. शुक्रवारी दुपारी ही महिला माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात दाखल झाली. मात्र तिची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने पोलिस ठाण्यासमोरच या महिलेने आत्मदहन करण्याचा इशारा दिला. उपविभागीय आधिकाऱ्यांनी वादग्रस्त पोलिस माने याची या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत बदली करण्याचे आश्वासन दिल्याने संबंधित महिलेने आपली तक्रार मागे घेतली.