सत्कार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्कार..
सत्कार..

सत्कार..

sakal_logo
By

02817
हातकणंगले ः सिद्धीचा सत्कार करताना आर. पी. पाटील, ए.ए. मुडलगींसह मान्यवर.

पदवीधर संघटनेतर्फे
सिद्धी चौगुलेचा सत्कार
हातकणंगले ः धरणगुत्तीतील सिद्धी दिलीप चौगुले हिने इयत्ता दहावीत ९६.८० गुण मिळविल्याबद्दल दक्षिण भारत जैनसभा पदवीधर संघटनेच्या वतीने जयसिंगपूर कन्या महाविद्यालयात तिचा सत्कार झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदवीधर संघटनेचे संस्थापक आर. पी. पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते. सिद्धी आळतेतील विनयकुमार पाटील यांची मुलगी तर धरणगुत्तीतील अपंग दिलीप चौगुले यांची दत्तक मुलगी आहे. सिद्धीचे प्राथमिक शिक्षण पी. आर. पाटील विद्यामंदिर तर माध्यमिक शिक्षण झेले हायस्कूलमध्ये झाले. खासगी शिकवणी न लावता धरणगुत्ती ते जयसिंगपूर सायकलने येत शिक्षण पूर्ण केले. ती अकरावी सायन्समध्ये शिकते. यावेळी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष ए. ए. मुडलगी, ए. ए. मासुर्ल, एस. एस. बेळंकी, माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील, प्रकाश झेले, डी. ए. पाटील, अदिनाथ किणींगेंसह मान्यवर उपस्थित होते.