आळतेचा पाणी पुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळतेचा पाणी पुरवठा बंद
आळतेचा पाणी पुरवठा बंद

आळतेचा पाणी पुरवठा बंद

sakal_logo
By

आळतेचा पाणीपुरवठा बंद
नागरिकांचे हाल; तातडीने सुरळीत करण्याची मागणी
हातकणंगले, ता. ६ ः आळते (ता. हातकणंगले) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेला पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू आहेत.
सात कोटी रुपये खर्च करून आळतेसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर केली. योजनेचे उद्‍घाटन होऊन गावाला वारणेचे पाणी सुरू झाले. मात्र अवघ्या वर्षातच पाणी उपसा पंप खराब होणे, जलवाहिनीला गळती लागल्याने वारंवार गावाचा पाणीपुरवठा खंडित होत आहे. गावची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास आहे. नूतन पेयजल योजनेअंतर्गत दोन हजार नळ कनेक्शन नागरिकांनी घेतले आहेत. नळ कनेक्शनधारक अधिक असल्याने प्रत्येक भागाला दोन दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत करावा व या महिन्याची पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
----------
कोट्यावधी रुपये खर्चुन ही पाणीपुरवठा योजना कित्येक दिवस बंद आहे. पाण्यावाचुन नागरीकांचे हाल होत आहेत. योजनेची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
-नंदकुमार कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
---------------
एका महिन्यात दोन्ही मोटारी खराब झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. योजना अजून मक्तेदाराच्या ताब्यात आहे. त्यांच्याविरोधात दोनच दिवसांपूर्वी तक्रार केली आहे.
-चंदन चव्हाण, ग्रामविकास अधिकारी
--------
ग्रामविकास अधिकारी थापा मारत आहेत. योजनेत त्रुटी होत्या तर योजना ताब्यात कशी घेतली. कब्जापट्टीवर त्यांच्याच सह्या आहेत. योजनेवरून राजकारण सुरू आहे.
-संजय पाटील, कंत्राटदार