रुकडी येथे मुले पळवून नेणारी टोळी आल्याच्या भीतीने शाळा झाल्या रिकाम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुकडी येथे मुले पळवून नेणारी टोळी आल्याच्या भीतीने शाळा झाल्या रिकाम्या
रुकडी येथे मुले पळवून नेणारी टोळी आल्याच्या भीतीने शाळा झाल्या रिकाम्या

रुकडी येथे मुले पळवून नेणारी टोळी आल्याच्या भीतीने शाळा झाल्या रिकाम्या

sakal_logo
By

मुले पळविणारी टोळी आल्याच्या
संशयाने रुकडीत गोंधळ
हातकणंगले, ता. ११ ः मुले पळविणारी टोळी आल्याच्या संशयाने रुकडी (ता. हातकणंगले) येथे आज गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गावात भीतीचे वातावरण पसरल्याने दुपारीच पालकांनी आपली मुले शाळेतून घरी नेल्याने दुपारीच शाळा ओस पडल्या. संबंधित महिलेसह नागरिकांनी हातकणंगले पोलिस ठाणे गाठले. पण, संबंधित महिला फेरीवाली असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रुकडी (ता. हातकणंगले) येथे अंदाजे ४० वयाची अनोळखी महिला रस्त्यावर फुगे विकण्यासाठी आली होती. गावात फिरून कमाई करून ही महिला हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेली असता अंगावर चहा सांडला म्हणून कपडे बदलून परत गावातून फुगे विकण्यासाठी गेली. त्यावर वेशांतर करून महिला फिरत असल्याची अफवा कोणीतरी पसरविली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. अशातच गावातील एक लहान मुलगी शेजारी खेळत होती, मात्र बराच वेळ उलटून गेला तरीही मुलगी घरी आली नसल्याने पालकांमध्ये घबराट पसरली. पालकांनी सदर मुलीचा शोध घेतला असता या महिलेनेच मुलीला उचलले असल्याची चर्चा होऊन बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मात्र, काही वेळातच ती मुलगी घरी परतली. दरम्यान, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली व गावातील सर्वच शाळांतील मुलांना पालक भीतीपोटी घरी घेऊन गेल्याने शाळाही काही क्षणात रिकाम्या झाल्याच्या दिसून आल्या.