राष्ट्रवादीचे उद्या एक दिवशीय शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे उद्या एक दिवशीय शिबीर
राष्ट्रवादीचे उद्या एक दिवशीय शिबीर

राष्ट्रवादीचे उद्या एक दिवशीय शिबीर

sakal_logo
By

राष्ट्रवादीचे उद्या एक दिवसीय शिबिर
हातकणंगले, ता. २ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेतले जाणार आहेत. १२ डिसेंबरला साजरा होणारा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यानिमित्त रविवारी (ता. ४) सकाळी साडेनऊ वाजता कुंथुगिरी, रामलिंग रोड आळते येथे ‘वेध भविष्याचा- विचार राष्ट्रवादीचा’ या एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. याचे उद्‍घाटन माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा निरीक्षक दिलीपतात्या पाटील, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळुंखे उपस्थित रहाणार आहेत. प्रमुख वक्ते समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी आहेत. हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, युवक, विद्यार्थी, सेवादल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, डॉक्टर, वकील या सर्व सेलचे पदाधिकारी आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.