मुडशिंगी बनले कृषि प्रात्यक्षिकांचे मॉडेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुडशिंगी बनले कृषि प्रात्यक्षिकांचे मॉडेल
मुडशिंगी बनले कृषि प्रात्यक्षिकांचे मॉडेल

मुडशिंगी बनले कृषि प्रात्यक्षिकांचे मॉडेल

sakal_logo
By

मुडशिंगी बनले कृषि प्रात्यक्षिकांचे मॉडेल
कोल्हापुरातील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवले उपक्रम
हातकणंगले, ता. ७ ः मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथे कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांनी ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम राबवला. ७ सप्टेंबरपासून विद्यार्थ्याकडुन विविध उपक्रम राबवले. या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मुडशिंगी कृषी प्रात्यक्षिकांचे मॉडेल ठरले आहे.
खेडयाची अभिमुखता आणि सर्वेक्षणामध्ये हवामान विषयक माहिती व सहभागी ग्रामिण मूल्यांकनद्वारे (पीआरए) खेडयाची सद्यस्थिती, नैसर्गिक ठेवा, रोजगार, मजूरांच्या समस्या याविषयी गावातील नागरिकांसोबत विचार मंथन करून अहवाल तयार केला. बियाणे उत्पादनासह कृषि इंटरवेनेशन (Interventions) मध्ये जीवामृत तयार करण्याची पध्दत व पिक उत्पादनात पिकांच्या रोगाची, किटकांची तसेच विविध अवस्थेची माहिती देवून मार्गदर्शन करणाऱ्या अॅपबद्दल प्रात्यक्षिक दाखवले. त्यासाठी विषयतज्ज्ञ डॉ जे. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
वनस्पती संरक्षण इंटरवेनेशनमध्ये बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया व बोर्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत व वापर प्रात्यक्षिके दाखवली. त्यासाठी विषयतज्ज्ञ डॉ. व्ही. एस. पाटील वनस्पती रोगशास्त्र विभाग यांचे मार्गदर्शन लाभले. फळ, भाजी आणि फुल उत्पादन इंटरवेनेशनमध्ये आंब्याच्या रोपाला कलम करणे व फळझाड लागवडीकरिता खड्डा खोदणे तसेच भरणे आदी प्रात्यक्षिके दाखवली.
पशुधन (प्राणी) उत्पादन इंटरवेनेशनमध्ये स्वच्छ दूध उत्पादन, चारा प्रक्रिया, जनावरांचा गोठा स्वच्छ करण्याची शास्त्रोक्त पध्दत आदी प्रात्यक्षिके दाखवली. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने‌ जनावरांमधील लम्पी रोग लसीकरण मोहीमेत सहभागी होऊन नागरिकास योग्य माहिती पुरवली.
विद्यार्थ्यांना सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सुर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एस. पोतदार, कार्यक्रम अध्यक्ष डॉ. के. व्ही. गुरव यांच्यासह विषयतज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले. कृषिदूत वैभव खांडेभराड, आदित्य राजगुरु, अक्षय शेलार, प्रसाद गावडे, अभिषेक तारळेकर, विशाल भालके, सुरजकुमार जाधव आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
-----------
चर्चासत्रांचे आयोजन
विस्तार आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरणामध्ये महिलांसाठी बासुंदी तयार करणे, पीक उत्पादनात जैव खताची भूमिका, ऊस उत्पन्न वाढ व हुमणीचे नियंत्रण यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याद्वारे शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले.