दारू पकडली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू पकडली..
दारू पकडली..

दारू पकडली..

sakal_logo
By

आळतेत उमेदवारांच्या नातलगांना
दारूची चोरटी वाहतूक करताना पकडले

हातकणंगले ः आळते (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दारूची चोरटी वाहतूक करताना दोन उमेदवारांच्या नातलगांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई कोल्हापूर-सांगली मार्गावर उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक शिवाजी शिंदे यांच्या पथकाने केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दारूची वाहतूक करताना दोघांना पकडले आहे. निवडणूक काळात अशा प्रकारांवर आमची करडी नजर राहणार आहे. याही प्रकरणात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.