बुद्धिबळ स्पर्धा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धिबळ स्पर्धा..
बुद्धिबळ स्पर्धा..

बुद्धिबळ स्पर्धा..

sakal_logo
By

71736, 71737

लोगो-
राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा

अग्रमानांकित खेळाडूंना धक्का

पहिल्या चार पटांवर डाव बरोबरीत राखण्यात नवोदित खेळाडूंना यश
हातकणंगले, ता. २८ ः संजय घोडावत विद्यापीठात सोमवार (ता. २६)पासून सुरू असलेल्या ४८ व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेतील तिसरी फेरी आज झाली. या फेरीत पहिल्या चार बोर्डांवर युवा खेळाडूंनी स्पर्धेतील अग्रमानांकित खेळाडूंना बरोबर राखले. ऋचा पुजारी, स्वाती घाटे आणि श्रीजा शेषाद्री या अग्रमानांकित खेळाडूंना महाराष्ट्राच्या आशना माखिजा, साक्षी चितलांगे आणि वृषाली देवधर यांनी पराभवाचे धक्के देत स्पर्धेतील तिसऱ्याच फेरीत धक्कादायक निकालांची नोंद केली.
पहिल्या बोर्डवर पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना आंध्र प्रदेशच्या बोमिनी मोनिकाने अग्रमानांकित वंतिका अग्रवालचा ३५ व्या चालीला डाव बरोबरीत सोडविला; तर महाराष्ट्राच्या विश्वा शाह हिने गतविजेत्या दिव्या देशमुखला ८७ चालीपर्यंत दीर्घकाळ चाललेल्या लढतीत डाव बरोबरीत रोखण्यात यश मिळविले. केरळच्या निम्मी जॉर्जने पेट्रोलियम बोर्डाच्या मेरी आना गोम्सला ६१ व्या चालीला बरोबरी साधली; तर महाराष्ट्राच्या ऋतुजा बक्षी हिने गोव्याची भक्ती कुलकर्णी हिला बरोबरीत रोखत सर्वांची वाहवा मिळवली. या स्पर्धेच्या अजून आठ फेऱ्या बाकी असून, महाराष्ट्राच्या साक्षी चितलांगे, आशना माखिजा आणि वृषाली देवधर, पश्चिम बंगालची ब्रिस्ती मुखर्जी या तीन गुणांसह स्पर्धेत अग्रेसर आहेत; तर त्यांच्यापाठोपाठ २० खेळाडू २.५ गुणांसह स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून कर्नाटकचे आंतरराष्ट्रीय पंच मंजुनाथ एम. काम पाहत असून, त्यांना सहायक पंच म्हणून विनिता श्रोत्री, भास्कर व्ही., अथर्व गोडबोले, मोहित लाडे, पौर्णिमा उपळावीकर, सुमुख गायकवाड आणि नीरजकुमार मिश्रा हे काम करीत आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, डॉ. अरुण पाटील, प्रा. विराट गिरी, अमित कोडक, तुषार, स्वप्नील अकोळे यांच्यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मनीष मारुलकर, धीरज वैद्य, आरती मोदी, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे, विवेक सोहनी, रोहित पोळ, प्रशांत पिसे, आदित्य आळतेकर, अमित मोदी, करण परीट मेहनत घेत आहेत. एमपीएल स्पोर्टस फाउंडेशन हे या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर्स असून, संजय घोडावत विद्यापीठ सहप्रायोजक आहे. यांच्याबरोबरच चितळे डेअरी, एच २ ई पुणे, जैन इरिगेशन, फिरोदिया ग्रुप हे सहयोगी प्रायोजक आहेत.