हातकणंगलेत कॉलमचाच उड्डाणपूल

हातकणंगलेत कॉलमचाच उड्डाणपूल

03071
नांदणी ः केंद्रीय मंत्री गडकरी यांना सागर पुजारी, दादा गोरे यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी अण्णासाहेब चकोते, प्रकाश आवाडे, धैर्यशील माने आदी उपस्थित होते.
------------
हातकणंगलेत कॉलमचाच उड्डाणपूल
सागर पुजारी यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळाला नितिन गडकरी यांचे आश्वासन

हातकणंगले, ता. ३१ ः दहा वर्षापासून कोल्हापूर -सांगली मार्गावर हातकणंगले येथील पूल कॉलमचा की भरावाचा या वादात काम थांबलेले आहे. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्यामुळे हातकणंगले येथे कॉलमचाच उड्डाणपूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी, दादा गोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. गडकरी यांनी याबाबत गांभीर्याने आणि सकारात्मक विचार करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
राज्याचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी हातकणंगले येथे भरावाऐवजी कॉलमचा उड्डाणपूल उभारू, असे आश्वासन दिले होते. परंतु त्याची परिपूर्ती झालेली नाही. सध्या हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत समावेश केलेला असून या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केलेली आहे. परंतु हातकणलेतील उड्डाण पूलासंदर्भात अस्पष्टता असल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन लक्ष वेधले. नांदणी येथील समारंभात त्यांनी यासंदर्भात मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com