Sat, June 3, 2023

शिबिराचा २०४ रुग्णांना लाभ
शिबिराचा २०४ रुग्णांना लाभ
Published on : 9 February 2023, 2:40 am
शिबिराचा २०४ रुग्णांना लाभ
हातकणंगले ः प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले येथे गुरुवारी महाआरोग्य शिबिर झाले. आरोग्य शिबिराची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी दिली. शिबिराचा २०४ रुग्णांनी लाभ घेतला. त्यामध्ये बालरोग व स्त्री रोग तज्ञ डॉ. राहुल देशमुख, ट्युलिप हॉस्पिटलकडील अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक देशपांडे व हृदया हॉस्पिटलकडील जनरल मेडिसिन श्रीनाथ कुलकर्णी यांनी तपासणी केली. शिबिरासाठी आरोग्य सहायक, सहायिका, आरोग्य सेवक, सेविका, सीएचओ, वाहनचालक, परिचर, आशा सेविका गटप्रवर्तक यांचे योगदान लाभले.