हातकणंगलेचा शरिरसौष्ठवपटू अर्जुन मोंगलेला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक.. भारत श्रीने सन्मानित.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातकणंगलेचा शरिरसौष्ठवपटू अर्जुन मोंगलेला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक.. भारत श्रीने सन्मानित..
हातकणंगलेचा शरिरसौष्ठवपटू अर्जुन मोंगलेला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक.. भारत श्रीने सन्मानित..

हातकणंगलेचा शरिरसौष्ठवपटू अर्जुन मोंगलेला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक.. भारत श्रीने सन्मानित..

sakal_logo
By

03135
रतलम (मध्य प्रदेश) ः येथील स्पर्धेत ‘कनिष्ठ भारत श्री’चा किताब मिळवणारा अर्जुन मोंगले.

हातकणंगलेचा अर्जुन ‘कनिष्ठ भारत श्री’
मध्य प्रदेशातील स्पर्धेत यश; आज मिरवणुकीने स्वागत

हातकणंगले, ता. ७ ः रतलाम (मध्य प्रदेश) येथे झालेल्या १३ व्या ‘कनिष्ठ भारत श्री’ स्पर्धत येथील शरीरसौष्ठवपटू अर्जुन मोंगले याने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पटकावत ‘कनिष्ठ भारत श्री’चा किताब पटकावला. भारतीय शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित स्पर्धत ४००हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या यशाबद्दल मोंगले याचा उद्या (ता. ८) सायंकाळी येथे नागरी सत्कार समितीतर्फे सर्वोदय मिरवणूक काढून सत्कार होणार आहे.
त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने विविध समाज सेवी संस्थांनी त्याला सढळ हातांनी मदत करावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
अर्जुनचे वडील विजय मोंगले म्हणाले, ‘अथक प्रयत्नातून यश त्याला मिळाले आहे. दररोज सकाळी चार आणि सायंकाळी दोन तास तो व्यायाम करतो. त्याचे खाण्यापिण्यावर कडक नियंत्रण आहे. जिमचे मालक नागेश सुतार यांच्या मार्गदर्शनामुळे तो यशस्वी होत आहे.’
ते म्हणाले, ‘तो वर्षभर स्पर्धेची तयारी करीत होता. त्याचा प्रत्येक महिन्याचा खर्च ३५ हजारांच्या आसपास आहे. तो पेलणारा नाही. अशा स्थितीत बाबूजमाल तालीम मंडळ, संभाजी ब्रिगेड, सचिन बोराडे, योगेश पाटील, रणजित धनगर, अरुण कुमार जानवेकर, दीपक वाडकर, रावसाहेब कारंडे, रोहित बिरनाळे, चंद्रकांत जाधव, सुभाष चव्हाण, गुरुदास चव्हाण, गुरू खोत यांची मदत मोलाची ठरली.’
अर्जुनने वयाच्या सातव्या वर्षांपासून बाबूजमाल तालीम मंडळ येथे व्यायामाला सुरुवात केली. तो २०२२ मध्ये इचलकरंजीतील एनएस फिटनेस क्लबमध्ये सहभागी झाला. त्याची प्रगती आणि कष्ट पाहून प्रशिक्षक सुतार यांनी शरीरसौष्ठवपटू होण्याचा सल्ला दिला. महिन्याभरात ‘कनिष्ठ महाराष्ट्र श्री २०२२’च्या स्पर्धेत त्याने ७० किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले. पॉंण्डेचरी येथील स्पर्धेत तो पाचवा आला. सांगरुळच्या स्पर्धेत प्रथम, वडगावमध्ये दुसरा, विद्यापीठ स्पर्धेत प्रथम, आरव्ही श्री स्पर्धेत दुसरा, राज्यस्तरीय खुल्या गटात पाचवा, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत पाचवा, यंदा कनिष्ठ जुनिअर महाराष्ट्र श्री अशी त्याची आजपर्यंतची कामगिरी आहे. सलग दोन वर्षे त्याने ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री’चा ही किताब पटकावला आहे.

फोटो..
रतलम ( मध्य प्रदेश ) येथील स्पर्धत ‘कनिष्ठ भारत श्री’चा किताब मिळवणारा अर्जुन मोंगले..
चौकट..
अर्जुन आणि त्याचे वडील पानपट्टी चालवून उपजीविका करतात. त्याचा महिन्याचा खर्च सुमारे ३५ हजार रुपये आहे. तो त्यांना पेलणारा नाही. त्यामुळे भविष्यांची चिंता त्यांना सतावू लागली आहे. अशा परिस्थितीत दानशूर व्यक्ती. संस्थाची मदतच त्यांच्यासाठी तारणहार ठरणार आहे.