अपघात. एक ठार

अपघात. एक ठार

03139
...

आळतेजवळ मोटारीचा टायर फुटून तरुण ठार

हातकणंगले- आळते (ता. हातकणंगले ) येथील धनलक्ष्मी स्टील कारखान्याजवळ मोटारीचा टायर फुटून मोटार विजेच्या खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात शशिकांत चंद्रकांत जाधव ( वय २६) हा तरुण ठार झाला. ही घटना मंगळवार (ता.७ ) रात्री उशीरा घडली. शशिकांत मंगळवारी साडेनऊच्या दरम्यान कामानिमित्त हातकणंगलेला गेला होता. रात्री उशीरा परत येत असताना त्याच्या मोटारीचा टायर फुटल्याने गाडी कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com